आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अखेर पोलिसांच्या हाती लागला. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतलंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. गोसावीला अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या समुद्री सीमवेर एनसीबीने एका क्रूझ जहाजावर कारवाई केली होती. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे चर्चेत आला. पण त्याआधी वेगवेगळ्या प्रकरणात तो पोलिसांनी हवा होता. त्याच्याविरुद्ध पुणे, पालघरसह चार फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. अखेर पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेतलं. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांच्याविरोधातल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक टीम गठीत केलीय. विश्वास नांगरे पाटील यांनी चौकशीसाठी आदेश काढलेत.
किरण गोसावीला पुणे पोलिसांनी कसं पकडलं?
मुंबई तक
28 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अखेर पोलिसांच्या हाती लागला. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतलंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. गोसावीला अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या समुद्री सीमवेर एनसीबीने एका क्रूझ जहाजावर कारवाई केली होती. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली. या प्रकरणातील साक्षीदार […]
ADVERTISEMENT