सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो 12 वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली .आता 12 वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरांत सुरु झाली. यावेळी स्पर्धेत परीक्षक नसून ‘ज्युरी’ असणार आहेत. हे ज्युरी दुसरे कोणी नसून, आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना नेमकं या परीक्षकांच्या खुर्चीत कसं वाटतंय? याबद्दल या पंचरत्नांशी मुंबई तकने विशेष संवाद साधला .
लिटील चँम्पसना परीक्षकाच्या खुर्चीत कसं वाटतंय?
मुंबई तक
18 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)
सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो 12 वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी […]
ADVERTISEMENT