राज ठाकरेंच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर

मुंबई तक

03 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)

राज यांचा हा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावला आहे. जो माणूस प्रगतीशील वाटायचा. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे, असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला लगावतानाच मुंब्र्याच नाव का […]

follow google news

राज यांचा हा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावला आहे. जो माणूस प्रगतीशील वाटायचा. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे, असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला लगावतानाच मुंब्र्याच नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, सकाळी लवकर उठून मुंब्र्याच्या कोणत्याही मदरश्यात या. मदरश्यात दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असं आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिलं.

हे वाचलं का?
    follow whatsapp