काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सत्ता येताच नितेश राणेंना जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे. इतर धर्मीयांबद्दल बोलूनही कारवाई होत नसल्यानं कैलास गोरंट्याल यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्री झोपलेत का, नितेश राणेंना अटक का केली नाही असा सवालही कैलास गोरंट्याल यांनी देवेंद्र फडणवीसांना केला. नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणेंचं डोकं खराब झाल्याचा टोलाही कैलास गोरंट्याल यांनी लगावला.