Maharashtra Vidhan Sabha, Uddhav Thackeray : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा जागावाटपाची चर्चा सुरू आहे. 288 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची उत्सुकता आहे. मविआतील तीन प्रमुख पक्षांकडून 100 पेक्षा जास्त जागांची मागणी केली गेली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रमेश चेन्नीथला यांनी माहिती दिली.