महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार? झाली तर कोण एकत्र लढणार, कोण किती जागांवर लढणार असे प्रश्न अनेक दिवसांपासून विचारले जातायत. अखेर या प्रश्नांचे काही प्रमाणात उत्तरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिले. त्या प्रमाणे महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या सेकंद हाफमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. आता दोन टप्प्यात निवडणूक झाली तर कोणाला फायदा, कोणाला तोटा? याआधी विधानसभेला असं कधी झालंय का हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कोणते नेते कोणत्या पक्षात सामील होणार, तसेच कोणते पक्ष एकत्र येऊन लढणार हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. निवडणुकीच्या तारखा आणि त्याचे परिणाम यावरही लोकांमध्ये उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर केलेल्या भाष्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीवर केंद्रित झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यात कोणते पक्ष बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार?
मुंबई तक
17 Sep 2024 (अपडेटेड: 17 Sep 2024, 08:45 AM)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आणि त्याचे परिणाम यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या दोन टप्प्यांबद्दल केलेले भाष्य महत्त्वाचं ठरतंय.
ADVERTISEMENT