मी वाईट माणूस नाही,मी सगळ्यांचे पैसे परत करणार आहे

मुंबई तक

24 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

मराठी मालिकाविश्वात सध्या दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांची चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवल्या. त्यामुळे तेव्हापासून लोकप्रिय मालिका आणि मंदार असं एक समीकरणच झालंय. पण यावेळी ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत. पैसे थकवल्याचा थेट आरोप शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानीस,संग्राम समेळ यांसारख्या हे मन बावरे या मालिकेतील कलाकारांनी केला आहे. या […]

follow google news

मराठी मालिकाविश्वात सध्या दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांची चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवल्या. त्यामुळे तेव्हापासून लोकप्रिय मालिका आणि मंदार असं एक समीकरणच झालंय. पण यावेळी ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत. पैसे थकवल्याचा थेट आरोप शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानीस,संग्राम समेळ यांसारख्या हे मन बावरे या मालिकेतील कलाकारांनी केला आहे. या आरोपावंर मंदार देवस्थळीने मुंबई तकशी खास बातचीत केली आणि आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तरं दिली आहेत..

हे वाचलं का?
    follow whatsapp