Manoj Jarange : शरद पवारांवर जरांगेंचं टीकास्त्र, ''मराठा समाजाचं वाटोळ...''

मुंबई तक

14 Aug 2024 (अपडेटेड: 14 Aug 2024, 04:07 PM)

मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर टीका करताना मराठा समाजाचे आजवर झालेले नुकसान अधोरेखित केले.

follow google news

Manoj Jarange On Sharad Pawar : जालना : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की शरद पवारांनी मराठा समाजाचे आजवर वाटोळे केले आहे. पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

त्या मार्गाने आरक्षण कसे देता येईल याचा त्यांनी सविस्तर पद्धतीने विचार करावा, असे आव्हान जरांगे यांनी पवारांना केले. तसेच, पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत, असेही त्यांनी महायुतीला उद्देशून म्हणाले.

    follow whatsapp