Satara News : साताऱ्यात भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ साताऱ्यातील प्रीती हॉटेल येथे उपचारासाठी हलवण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. साताऱ्यातील या भाषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाषण देत होते तेव्हा हे घडले. त्यांच्या प्रकृतीची अवस्था आणि त्यांच्यावर केलेल्या उपचारांची माहिती येत्या काही तासांत समजेल. नागरिकांना त्यांच्या तब्येतीची चिंता असून सध्याच्या परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT