मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा इशारा, अंतरवाली सराटीत मराठा समाज आक्रमक

मुंबई तक

30 Aug 2024 (अपडेटेड: 01 Sep 2024, 09:41 AM)

अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला वर्ष पूर्ण, उपोषणाचा इशारा पुनः दिलाय.

follow google news

Manoj Jarange Patil :  जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा 29 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यांनतर आता पुन्हा एकदा जरांगे यांनी आमरण उपोषणाला बसू नये, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आज जालनाच्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत जरांगे यांनी 29 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. या इशारानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून यांनी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलीय. आपण मुंबई सोबत दिल्लीला पण जाऊ, मात्र आता मनोज जरांगे यांनी आपला आमरण उपोषणाला बसन्याचा निर्णय मागे घ्यावा अस मराठा आंदोलकांनी म्हटलंय. अंतरवाली सराटीमधील मराठा आंदोलकांसोबत बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी.

हे वाचलं का?
    follow whatsapp