जालन्याच्या अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय. आज ही घटना आठवली तर अंगावर काटे येतात अशी प्रतिक्रिया जालन्याच्या अंतरवाली गावातील नागरिकांनी दिलीय. आज घटनेला 12 महिने झाले, मात्र सरकारने अद्याप लाठीमारच्या घटनेची दखल घेतली नसल्याचं म्हणत अंतरवालीकरांनी राज्य सरकारचा निषेध नोंदविलाय. लाठीमार मुळे आजही अंतरवाली गावातील महिला पुरुषांच्या शरीरावर जखमा दिसत असून काहींच्या शरीरात आज ही छऱे तसेच आहेत. सरकार आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थ म्हणालेत. दरम्यान या घटनेचा संपर्ण थरार जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी.