महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या गोष्टीवरून वाद होत नाहीत? कधी जागांवरून, कधी मुख्यमंत्रिपदावरून कधी निधीवरून कधी श्रेयवादावरून तर कधी विचारसरणीवरूनही...पण आता तर मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडण्यावरूनही महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांची मापं काढलेली आपण पाहिली. रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांचा वाद ताजा असतानाच नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला, नेमकं हे काम रखडलंय कुठे आणि काय राजकारण सुरू आहे, समजून घेऊयात.