मुंबई: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन लावण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी झालेल्या टास्ट फोर्सच्या बैठकीत लोकांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे, त्यातच सध्याच्या घडीला वाढत असणारी रुग्णसंख्या पाहता आपली आरोग्य व्यवस्थाही कमी पडेल अशी स्थिती निर्माण झाली असल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
राज्य सरकारच्या या संभाव्य लॉकडाउनला भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार? असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
टॉप 5 हेडलाईन्स
1. राज्यात लॉकडाउनला राष्ट्रवादीचाही विरोध
2. संजय राऊतही म्हणतात, आता पुन्हा लॉकडाउन नको
3. सरकार कठोर निर्बंधांच्या तयारीत?
4. BMC चे सर्व हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश
5. हल्ला मोहल्ला कार्यक्रमात शीख तरुणांचा पोलिसांवर तलवारीने हल्ला
ADVERTISEMENT