मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (31.3.2021)

मुंबई तक

31 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने चौकशीच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल उचललं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केली होती असं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेरीस राज्य […]

follow google news

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने चौकशीच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल उचललं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केली होती असं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेरीस राज्य सरकारने परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांची एक सदस्यीय समितीकडून चौकशी करण्याचं ठरवलं आहे. त्या व्यतिरिक्त कोरोनासंदर्भातही काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.

हे वाचलं का?

टॉप 5 हेडलाईन्स:

1. राज्याची कोरोनास्थिती चिंताजनक, केंद्राचा इशारा

2. घाईने लॉकडाऊन नाही, टोपेंचं स्पष्टीकरण

3. औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द, प्रशासनाचा निर्णय

4. शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

5. लॉकडाऊन लागलं तरी दहावी, बारावीच्या परीक्षा होणारच – वर्षा गायकवाड

    follow whatsapp