नांदेडमध्ये लाडकी बहीण या उपक्रमाअंतर्गत साडी वाटप कार्यक्रम झाला. तामसा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोन हजार साड्या वाटप करण्याचे ठरले होते, परंतु जितक्या महिलांची उपस्थिती होती तितक्या साड्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे महिलांची झुंबड उडाली आणि गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात काही महिलांनी साड्या हिसकावून घेतल्या. साडी मिळालेली नाही आणि जेवणही नाही, या कारणास्तव महिलांनी नाराजी व्यक्त केली.