आज विधानपरिषदेत निरोप देताना नीलम गोऱ्हे कपिल पाटील यांच्याविषयी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी आंध्र प्रदेशचा त्यांचा एक किस्सा सांगितला. हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की, एका सामाजिक कार्यासाठी आम्ही आंध्र प्रदेशला गेलो होतो. तेव्हा निखिल वागळे आणि कपिल पाटील परत यायला तयार नहोते. मी शेवटी एस. एम. जोशींना फोन केला. तेव्हा ते म्हणाले की त्यांना घेऊनच या. पण नंतर लोक मला म्हणायला लागली की यांना का आणलं परत, तिथेच सोडून यायचं होत.