नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना खडेबोल चांगलं काम केलं तर गळ्यात हार टाकू अन्यथा स्वेच्छानिवृत्ती देऊ. नितीन गडकरी सतत त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात.. त्यांच्या याच वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा नागपुरात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करुन दाखवा. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, अशा शब्दांत नितीन गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना खडे बोल सुनावले आहे.
ADVERTISEMENT