पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषण आंदोलनात एक युवकाने विष घेण्याचा प्रयत्न केला आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे आणि या पार्श्वभूमीवर संजय चौगुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू असल्यामुळे समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. धनगर उपोषण करते माऊली हळनवर यांनी देखील शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे समाजात मोठा गोंधळ उडाला आहे.