ADVERTISEMENT
महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. गेल्या तीन दिवसांपासून राजकारण शरद पवारांभोवती फिरत असून, पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पवारांनी निर्णय बदलण्याचा आग्रह केला. त्यानंतर आज पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली.
Praful Patel On Sharad Pawar resignation rejection | NCP | Supriya Sule
ADVERTISEMENT