गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय नाट्यपरिषदमध्ये सुरू असलेल्या वादांना, विरोधकांच्या कुरघोड्यांना मंगळवारी पत्रकार परिषद घेत आणि योग्य ते पुरावे सादर करत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रसाद कांबळी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. ते भ्रष्ट कारभार करत आहेत, त्यांना पायउतार व्हावं लागेल, या त्यांच्या विरोधकांनी उठवलेल्या बातम्यांना एक प्रकारे चाप लागला आहे. नाट्यपरिषदेचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रसाद कांबळी यांनी त्यांच्या २०१८ ते २०२१ मधील अध्यक्षीय कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला, यात त्यांनी विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाची तथ्यानुसार आणि पुराव्यासहित आपलं म्हणणं पवारांसमोर मांडलं. यानंतर शरद पवारांनी तुम्ही ही सगळी तथ्यं मिडीयासमोर जाहिर करा, आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना उत्तर द्या अशी सूचना केली. यानंतर मंगळवारी पत्रकार परिषद घेत प्रसाद कांबळींनी पुराव्यासहित विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तरं दिली. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या पोकळ आरोपांना आता चाप बसली असून ,प्रसाद कांबळींना अध्यक्षपदापासून हटवता येणार नाही आणि विश्वस्त म्हणून शरद पवारांनी तथ्यासहित पुराव्याची छाननी केल्यामुळे प्रसाद कांबळी राजीनामा देणार या बिनबुडाच्या बातम्यांना आता तरी चाप बसला आहे. यावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्य
नाट्यपरिषदेचं काम उत्तम केल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही
मुंबई तक
16 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)
गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय नाट्यपरिषदमध्ये सुरू असलेल्या वादांना, विरोधकांच्या कुरघोड्यांना मंगळवारी पत्रकार परिषद घेत आणि योग्य ते पुरावे सादर करत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रसाद कांबळी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. ते भ्रष्ट कारभार करत आहेत, त्यांना पायउतार व्हावं लागेल, या त्यांच्या विरोधकांनी उठवलेल्या […]
ADVERTISEMENT