पुणे: तुफान पावसामुळे पुणे शहरात नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. अनेक भागात पावसाच्या पाण्यासह नदी पात्राबाहेर आलेलं पाणी साचलं आहे, यामुळे अनेकांची वाहनं पाण्यात अडकल्या आहेत. काही ठिकाणी लोकांच्या दुचाकी पाण्याने झाकलेल्या असल्याची भिती व्यक्त होतेय. हे पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांचे हाल होत आहेत. या प्रचंड पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना मोठ्या त्रासातून जावं लागत आहे.