Pune Rain Alert Ground Report : काल २५ जुलै रोजी पुण्यात झालेल्या दमदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर करावे लागले. पुणे शहराला मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला आहे. पुण्यात आज पावसाचा जोर ओसरला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र अनेक भागात चिखल झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी पावसाने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या येथून फक्त १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, आधी ३१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस थांबला आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून प्रशासन अलर्ट आहे.
Pune Rain मुंबई Tak ग्राऊंड रिपोर्ट : घरात चिखल; पुणेकर संतापले; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया!
मुंबई तक
26 Jul 2024 (अपडेटेड: 26 Jul 2024, 04:48 PM)
पुण्यात झालेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना स्थलांतर करावे लागले. पाऊस ओसरला असला तरी चिखलामुळे त्रास होत आहे. प्रशासन अलर्ट आहे.
ADVERTISEMENT