मंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार राजेंद्र राऊतांच्या बार्शीतील आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र चंद्रकांत पाटलांनी दोन मागण्यांवरुन नकारात्मकता दर्शवली आहे. तर राजेंद्र राऊत आंदोलनावर ठाम आहेत. महायुती सरकारला पाठिंबा दिलेला असला तरी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. याशिवाय आंदोलनाविषयी मला सांगण्याचा सरकारचा काय संबंध? आरक्षणावर आणि विशेष अधिवेशनावर निर्णय घ्या म्हणत राजेंद्र राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या मध्यस्थीनंतरही आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रकांत पाटलांच्या नकारात्मक भूमिकेमुळे राजेंद्र राऊत संतापले असून सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राजेंद्र राऊत का संतापले?
मुंबई तक
16 Sep 2024 (अपडेटेड: 16 Sep 2024, 08:57 AM)
चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राजेंद्र राऊतांच्या दोन मागण्यांवरुन त्यांना नकारात्मकता दाखवण्यात आली आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत संतापले असून आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT