Pune Truck Video : पुण्याच्या समाधान चौक जवळ सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात पुणे महापालिकेचा ट्रक ड्रेनेज साफ करण्यासाठी गेला होता. हा ट्रक आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गेला होता. यावेळी ट्रक मागे घेतला जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रक तसाच त्या खड्ड्यात जावून कोसळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
ADVERTISEMENT
ट्रक रिव्हर्स होत असताना ट्रकची मागची चाकं उभ्या असलेल्या ठिकाणची जमिनी अचानक खाली गेली. तिथे खोल खड्डा पडला आणि पाहता-पाहता संपूर्ण ट्रक खाली कोसळला. यानंतर तिथे असलेल्या इतर नागरिकांनी ट्रकच्या दिशेला धाव घेतली. यावेळी चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.
ADVERTISEMENT