Raj Thackeray : …तर फटाक्यांची माळ लावेन, असं वाझे प्रकरणावर राज ठाकरे का म्हणाले?

मुंबई तक

14 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

उद्धव ठाकरे आणि व्यावसिक मुकेश अंबानी यांच्यातले परस्पर संबंध खूप चांगले आहेत. सचिन वाझे पोलीस खात्यात आल्यानंतर निलंबित झाला होता, त्यानंतर त्याला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. सचिन वाझे हा देखील उद्धव ठाकरेंच्या जवळचा आहे. अशात प्रश्न हा आहे की मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाने म्हणजेच सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली? मूळ […]

follow google news

उद्धव ठाकरे आणि व्यावसिक मुकेश अंबानी यांच्यातले परस्पर संबंध खूप चांगले आहेत. सचिन वाझे पोलीस खात्यात आल्यानंतर निलंबित झाला होता, त्यानंतर त्याला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. सचिन वाझे हा देखील उद्धव ठाकरेंच्या जवळचा आहे. अशात प्रश्न हा आहे की मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाने म्हणजेच सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली? मूळ प्रश्न हा आहे. त्याचं उत्तर काय ते काहीच कळत नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगबादमध्ये केलं आहे. आज राज ठाकरेंना सचिन वाझेसंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp