मराठा आरक्षणाच्या वादावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना आता मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडवली आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अंतरवाली सराटी येथे लाठीहल्ला झाल्यानंतर जरांगे तेथून निघून गेले होते आणि नंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना पुन्हा उपोषणस्थळी बसवलं. भुजबळांच्या या आरोपामुळे आरोप-प्रत्यारोपांचे वाद पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांनी भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
छगन भुजबळांच्या आरोपांवर रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
मुंबई तक
15 Sep 2024 (अपडेटेड: 15 Sep 2024, 08:41 AM)
अंतरवाली सराटी येथे लाठीहल्ला झाल्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी उपोषणस्थळी जरांगेंना परत बसवलं, असा गंभीर आरोप भुजबळांनी केला आहे. यामुळे आरोप प्रत्यारोपांचा दौर सुरू झाला आहे.
ADVERTISEMENT