संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की जरांगे पाटील, रत्नराज आंबेडकर आणि आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. जरांगेंसोबत भेट होण्यापेक्षा निवडून आणणे गरजेचे आहे. ज्योती मेटे देखील तिसऱ्या आघाडीत येण्यासाठी अनुकूल आहेत आणि त्या संबंधाने माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून अनेक नवीन सुरुवातींचा विचार होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे एक महत्वाचे पाऊल असू शकते. मनोज जरांगे यांच्या सहकार्याने हे लक्ष पूर्ण करता येईल, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.