मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला संभाजीराजे; ओबीसी आंदोलकांना दिलं उत्तर

मुंबई तक

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 08:31 AM)

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. आज संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि सरकारवर टीका केली. ओबीसी आंदोलकांनी संभाजीराजेंच्या भेटीवरून नाराजी व्यक्त केली.

follow google news

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जोरात सुरु आहे. मराठा आंदोलकांची तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची या आंदोलनावर लक्ष आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत भेट दिली आणि जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, संभाजीराजे यांनी ओबीसी आंदोलनाला भेट न दिल्याने हाके आणि वाघमारे यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि टीकास्त्र सोडलं. या भेटीमुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात कुठल्या नव्या घटना घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे वाचलं का?
    follow whatsapp