संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध भाणुदास जाधव बीड विधानसभेत उतरणार?

मुंबई तक

18 Aug 2024 (अपडेटेड: 18 Aug 2024, 10:54 AM)

मराठा मोर्चा समन्वयक भाणुदास जाधव यांनी बीड विधानसभेसाठी जोरदार तयारी केलीय. ते संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

follow google news

मराठा मोर्चा समन्वयक आणि सीए भाणुदास जाधव यांनी बीड विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केलीय. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीड विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं भाणुदास जाधव यांनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याचंही भाणुदास जाधव यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंच विश्वासू सहकारी म्हणून जाधव यांना बीडमध्ये ओळखले जाते. संदीप क्षीरसागर यांच्यासह क्षीरसागर परिवाराने कोणतंही काम केलं नाही म्हणत आतापासूनच बी.बी. जाधवांनी तोफ डागायला सुरुवात केलीय. भाणुदास जाधव यांनी बीड विधानसभेचं गणित मांडलंय.

हे वाचलं का?
    follow whatsapp