आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलिसांनी धुतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवर शेअर करून मोठे प्रकरण उभे केले आहे. 'कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा' असे त्यांनी फेसबबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेनंतर अनेकांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पाठिंबा दिला आहे आणि पोलिसांचे असे कृत्य निंदनीय असल्याचे म्हटले आहे. सध्या या घटनेवरून अनेकांमध्ये रोष आहे आणि संबधित अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत. हा व्हिडीओ कशासाठी शूट करण्यात आला होता आणि यात नेमकं सत्य काय आहे, याचा तपास सुरू आहे.