देशात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. शुक्रवारी या चर्चेत सहभागी होताना शिवसेना खासदार संजय राऊत राज्यसभेत मोदी सरकारवर कडाडले. नरेंद्र मोदींना मिळालेल्या प्रचंड बहुमतावरूनही त्यांनी सरकारला जोरदार टोला लगावला.
ADVERTISEMENT
‘जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवलं जातंय. आता सगळ्या गुन्ह्यांसाठी एकच कायदा ठेवा,’ असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘जो खरं बोलतोय, लिहितोय त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जातंय. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो,’ असं संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा आम्हा सगळ्यांनाच आदर आहे. त्यांना लोकांनी प्रचंड बहुमत दिलंय. पण बहुमत खूप चंचल असतं. अहंकारानं सत्ता चालवता येत नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारविरोधी बोलणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली.
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘आज शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही गोष्ट देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही चांगली नाही. शेतकरी आंदोलन ही केवळ तीन राज्यांची लढाई नाही. संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे.’
संजय राऊत यांचं राज्यसभेतलं संपूर्ण भाषण ऐका इथे-
ADVERTISEMENT