Maharashtra Vidhan Sabha election 2024 : अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांच्या जवळचे अनेक नेतेही त्यांच्या गटात सामील झाले. महायुती सरकारमध्ये मंत्री झाले. एकनिष्ठ वाटणारे नेतेच सोडून गेल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला. पण, या धक्क्यातून बाहेर पडत पवारांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ताकद दाखवून दिली. आता शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्वा वळसे पाटील यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. शरद पवारांनीच विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष घातले असल्याने वळसे पाटलांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आता त्याचा परिणाम काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, उमेदवारी जाहीर केल्यानंतर दोन्ही गटांची रणनीती काय असेल आणि ती कशी पुढे येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळं राजकारण समजून घेण्यासाठी व्हिडीओ पहा
ADVERTISEMENT