आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ‘मुंबई तक’शी बोलताना शरद पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले.
ADVERTISEMENT
इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. शरद पवारांच्या याच परखड, स्फोटक मराठी मुलाखतीनं देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.
या मुलाखतीत पवारांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का? या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर स्फोटक भाष्य केलं. सोनिया गांधी, राहुल गांधी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या राजकारणाबद्दल त्यांनी आपली मतं मांडली.
ADVERTISEMENT