Sharad Pawar on Devendra Fadnavis : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर मविआकडून त्याविरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मविआचे सर्वच नेते सहभागी झाले होते. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या सूरत लुटीविषयी भाष्य केलं होतं. त्यावरच आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांच्या मते, इतिहासाची यथोचित चर्चा आणि अभ्यास करून प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. इतिहासातल्या घटनांचे संदर्भ योग्य पद्धतीने मांडले जावेत, असेही पवार म्हणाले. महाराजांच्या सूरत लुटीच्या इतिहासाचा योग्य त्या पार्श्वभूमीवर अभ्यास व्हावा आणि योग्य त्या पद्धतीने या घटनांचा उल्लेख व्हावा, अशी शरद पवारांची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT