नवी दिल्ली: परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. आज राज्यभरात भाजपने अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे.
ADVERTISEMENT
त्यानंतर आता शरद पवार यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवली असून त्या बैठकीकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. मात्र आता त्या बैठकीपूर्वी शरद पवार दिल्लीतून पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत ते अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल, परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल काय महत्त्वपूर्ण माहिती देणार?
ADVERTISEMENT