Maharashtra Assembly Election : हायकोर्टानं साखर कारखान्यांच्या 2 हजार 265 कोटी रुपयांच्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनचं वितरण थांबवण्याचे आदेश दिलेत. राज्य सरकारने अनुदानित क्रेडिटसाठी 17 साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोनसाठी हमी देण्याचा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT
सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्यांना विशेष माप दिल्याची तक्रार काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांनी केली आणि हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. बारामती, शिर्डी आणि नगर लोकसभेत सत्ताधारी पक्षांचे उमेदवार पराभूत झाल्यामुळे हा प्रश्न उभा राहिला. या पराभवानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यांना मंजूर झालेलं कर्ज रोखण्याचा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT