आज माझे बाबा म्हणजे मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या नवीन नाटकाच्या मुहुर्तला हवे होते,असे भावूक उद्गार काढलेत त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने. धनंजय माने इथेच राहतात .. या व्यावसायिक नाटकाद्वारे स्वानंदी बेर्डे अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. मुंबई तकने यानिमित्त घेतलेल्या विशेष मुलाखतीत स्वानंदीने आपल्या वडिलांच्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी जागवल्या.. बाबांना मी नाटकातून पदार्पण करतेय याचा विशेष आनंद झाला असता. बाबांनीही आपलं करियर एकांकिका,नाटकापासूनच सुरू केलं होतं. त्यामुळे बाबांना माझ्या या निर्णयाने समाधन मिळालं असतं असं मत स्वानंदीने यावेळी व्यक्त केलं. लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणी जागवताना स्वानंदीने अनेक गोष्टी मुंबई तक सोबत शेअर केल्या. आज बाबा असते तर त्यांनी नक्की मला नाटकात काम करण्यासाठी मदत केली असती, अनेक उपयोगात येतील असे मोलाचे सल्ले दिले असते. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे विनोदाचं दर्जेदार टायमिंग . याबाबतीत त्यांचा हात धरणारा कलाकार अजून तरी निर्माण झाला नाहीये. बाबांचं विनोदाचं टायमिंग हे मला शिकण्यासारखं आहे. मला ही मुळात विनोदी भूमिका करणं प्रचंड आवडतं. त्यामुळे बाबांसारखंच मी ही माझ्या करिअरची सुरवात विनोदी नाटकाने केली आहे याचा मला अभिमान वाटतोय.
स्वानंदी बेर्डेची रंगमंचावरची एंट्री पाहायला हवा होता लक्ष्या
मुंबई तक
13 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)
आज माझे बाबा म्हणजे मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या नवीन नाटकाच्या मुहुर्तला हवे होते,असे भावूक उद्गार काढलेत त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने. धनंजय माने इथेच राहतात .. या व्यावसायिक नाटकाद्वारे स्वानंदी बेर्डे अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. मुंबई तकने यानिमित्त घेतलेल्या विशेष मुलाखतीत स्वानंदीने आपल्या वडिलांच्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी जागवल्या.. बाबांना मी नाटकातून पदार्पण करतेय […]
ADVERTISEMENT