Uddhav Thackeray passed in front of Anandashram but the car didn’t stop.
ADVERTISEMENT
ठाणे : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गुरुवारी (२६ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रममध्ये जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांनी आनंद आश्रमात जाण्याचं टाळलं. (Uddhav Thackeray passed in front of Anandashram but the car didn’t stop)
शिवसेना (UBT) खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या दौऱ्यादरम्यान, ठाकरे आनंद आश्रमात जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र धर्मवीर आनंद दिघे यांचं आनंद आश्रम हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे अधिकृत कार्यालय आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे हे आनंद आश्रमात का येत आहेत असा आक्षेप घेतला होता. तसंच त्यांनी स्थानिक पोलिसांकडेही आक्षेप नोंदविला होता.
त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसेना (UBT) चे खासदार राजन विचारे यांना ठाकरेंच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेण्याची विनंती केली होती. या विनंतीमुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमासमोरुन जाऊन देखील आतमध्ये जाणं टाळलं असल्याचं बोललं जात आहे.
आनंद आश्रम कोणाची प्रॉपर्टी नाही : राजन विचारेंनी ठणकावलं
दरम्यान, ठाकरेंनी दौरा का टाळला याबाबत बोलताना खासदार राजन विचारे म्हणाले, आमच्या रुटमध्ये दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार घालायचा. जैन समाजाचा कार्यक्रम आणि जैन मंदिरात जायचं, असा कार्यक्रम नियोजीत होता. आनंद आश्रमात जाण्याचा कार्यक्रम नियोजीत नव्हताच. तुम्ही बघितलं असेल तिथं सगळे बॅरिकेट्स आहेत.
पण त्यांच्या सांगण्याने आम्ही थांबलोय, असं नाही. आनंद आश्रमाचं नाव कोणी पक्ष कार्यालय म्हणून ठेवू शकत नाही. या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना माहित आहे हे आनंद दिघेंचा आश्रम आहे. ही त्यांची प्रॉपर्टी नाही. इथे कोणीही कोणाला मज्जाव करु शकतं नाही, हे कोण थांबविणार? असा सवालही राजन विचारे यांनी केला.
ADVERTISEMENT