Uddhav Thackeray की Raj Thackeray कोणाच्या सभेला गर्दी जास्त? | Mahad Sabha | Ratnagir Sabha | MNS

मुंबई तक

06 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:43 AM)

Uddhav Thackeray vs Raj Thackeray crowd in Mahad Sabha and Ratnagir Sabha | MNS

follow google news

हे वाचलं का?

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. खेड, मालेगाव, पाचोरानंतर उद्धव ठाकरेंची शनिवारी ६ मेला महाडमध्ये सभा झाली. या सभेत काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दिवंगत माणिकराव जगताप हे काँग्रेस आमदार राहिलेत. शिवसेनेतल्या फाटाफुटीत जगताप यांच्या मुलीने ठाकरे गटात प्रवेश केला. महाड मतदारसंघ शिंदेंसोबत गेलेले बंडखोर आमदार, शिवसेनेचे प्रतोद भरतशेट गोगावले यांचा आहे. ठाकरेंच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार भास्करराव जाधव, वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्धव ठाकरे महाड सभा LIVE

Uddhav Thackeray vs Raj Thackeray crowd in Mahad Sabha and Ratnagir Sabha | MNS

    follow whatsapp