गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडली. “या भेटीत शंकाचं निरसन झालं असून, साहेबांनी उद्याच्या ठाण्याच्या सभेला यायला सांगितलं आहे,” असं म्हणत वसंत मोरे यांनी भेटीनंतर महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याविरुद्ध भूमिका घेतली. पक्षाध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेवर मनसेमध्ये अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी राजीनामेही दिले. पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर लावला होता. राज ठाकरेंनी वसंत मोरेंना काय आदेश दिला?
राज ठाकरे भेटीनंतर वसंत मोरे काय म्हणाले?
मुंबई तक
11 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडली. “या भेटीत शंकाचं निरसन झालं असून, साहेबांनी उद्याच्या ठाण्याच्या सभेला यायला सांगितलं आहे,” असं म्हणत वसंत मोरे यांनी भेटीनंतर महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण […]
ADVERTISEMENT