अरविंद केजरीवाल यांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे. केजरीवालांच्या उत्तराधिकारी ठरणार असल्यानं त्यांच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अतिशी नेमक्या आहेत कोण? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आणि त्यांच्या आडनावाचं काय गुपीत आहे हे जाणून घेऊया. अतिशी यांचा शिक्षणिक प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे त्यांचं नाव दिल्लीच्या शिक्षण क्रांतीत अग्रणी आहे. राजकीय कारकीर्दीची सुरुवात आम आदमी पार्टीसोबत केली आणि राजकीय मैदानात आपलं स्थान ठेवलं. मार्च 2023 पासून दिल्ली सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांची धडाडी आणि नेतृत्वगुण केजरीवालांच्या निवडीमध्ये महत्वाचे ठरले आहेत. अतिशी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या भविष्याचे स्वप्न केजरीवालांनी पाहिले आहे. आता तिचं कार्य बघणं महत्वाचं ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या संघर्षमय नेत्या बद्दल थोडक्यात माहिती.