परंडा हा उस्मानाबाद जिल्ह्यातला मागासलेला दुष्काळी भाग. याच भागातलं इर्ला हे भाई उद्धवराव पाटील यांचं गाव. ३० जानेवारी १९२० ला उद्धवरावांचा जन्म झाला. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी झाली. उद्धवरावांचं प्राथमिक शिक्षण काटी इथे झालं. उद्धवरावांनी सुरवातीला वकिली केली. मात्र तत्वनिष्ठ स्वभावामुळे ते जास्त काळ वकिलीच्या धंद्यात रमले नाहीत. खोट्याचं खरं करणं त्यांना जमलं नाही. शेवटी यातून काढता पाय घेत त्यांनी वकिली कायमची थांबवली. शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या सावकारशाहीला मोडीत काढण्यासाठी तरुणांचं संघटना बांधायला सुरवात केली. उद्धवरावांनी केवळ सावकारशाहीलाच नाही तर महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनाही सळो की पळो करून सोडलं. भाईंच्या विधानसभेतल्या भाषणांनी तर सत्ताधाऱ्यांचा घाम काढला. त्यामुळेच ते विचारवंत राजकारण म्हणून ओळखले जायचे. अशा या विचारवंत नेत्याचं राजकारण कसं होतं, भाई उद्धवराव पाटील कोण होते, काँग्रेस मातब्बरीच्या काळात त्यांनी आपला वेगळ्या विचारांचा झेंडा कसा फडकवत ठेवला, त्यांचं मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं योगदान काय हे आपण काही गोष्टींच्या मदतीने या व्हिडिओत जाणून घेणार आहोत.
भाई उद्धवराव पाटील यांच्यावर टीका करून आचार्य अत्रेंना पश्चाताप झाला, कारण…
मुंबई तक
27 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
परंडा हा उस्मानाबाद जिल्ह्यातला मागासलेला दुष्काळी भाग. याच भागातलं इर्ला हे भाई उद्धवराव पाटील यांचं गाव. ३० जानेवारी १९२० ला उद्धवरावांचा जन्म झाला. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी झाली. उद्धवरावांचं प्राथमिक शिक्षण काटी इथे झालं. उद्धवरावांनी सुरवातीला वकिली केली. मात्र तत्वनिष्ठ स्वभावामुळे ते जास्त काळ वकिलीच्या धंद्यात रमले नाहीत. खोट्याचं खरं करणं त्यांना जमलं नाही. शेवटी यातून […]
ADVERTISEMENT