Anil Arora Suicide Case: आत्महत्या केलेल्या अनिल अरोरांच्या मृतदेहाचं भाभा रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलंय. त्यांनी सुसाईड का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचा शोध घेतला जातोय. अनिल अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी असल्याचं बोललं जात आहे. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर अर्जुन कपूरही मलायकाच्या घरी पोहचला.