ADVERTISEMENT
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे वृत्त काही माध्यमांतून झळकले. त्यामुळे पंकजा मुंडेंभोवती चर्चेनं फेर धरला होता. यावर आज त्यांनी मौन सोडलं. हे वृत्त देणाऱ्या वृत्तवाहिनीवर आपण मानहानीचा दावा ठोकणार असून, ही माहिती त्यांना कुणी दिली? असा सवाल पंकजांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपने आपल्याला दोन वेळा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र ऐनवेळी फोन करून थांबवले, असा दावाही पंकजांनी केला आहे.
ADVERTISEMENT