महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला का लागतोय ब्रेक? हे आहे कारण..

मुंबई तक

11 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

आजवर लसीकरणात ४५ वयाच्या वरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण आता महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, याच वयोगटातील नागरिकांचं बरचंस लसीकरण हे शिल्लक राहिलं आहे. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत जी माहिती दिली ती आपणा सर्वांना विचार करायला लावणारी आहे. आज घडीला राज्यात 45 वयाच्या वरील ज्या नागरिकांनी […]

follow google news

आजवर लसीकरणात ४५ वयाच्या वरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण आता महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, याच वयोगटातील नागरिकांचं बरचंस लसीकरण हे शिल्लक राहिलं आहे. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत जी माहिती दिली ती आपणा सर्वांना विचार करायला लावणारी आहे. आज घडीला राज्यात 45 वयाच्या वरील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे पण ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशांची संख्या ही 5 लाख एवढी आहे. केंद्र सरकारकडून या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचे फक्त 35 हजार डोस आपल्याकडे आता उपलब्ध आहे. पण महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचे जे पावणे तीन लाख डोस विकत घेतले होते असे मिळून तीन ते सव्वातीन लाख डोस हे आता 45 वयोगटातीला लोकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरले जाणार आहेत.’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हे वाचलं का?
    follow whatsapp