जालन्याच्या वडीगोद्री परिसरात ठिकठिकाणी पाऊसाला सुरूवात झाली आहे, तर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मागील अडीच तासांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलकांचं रास्ता रोको आंदोलन पावसामुळे मागे घेण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला 8 दिवस पूर्ण झाले असून, सरकारने या उपोषणाचे गांभीर्य घेतले नसल्यानं मराठा आंदोलकांचा राग वाढला होता. आंदोलकांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला आणि भव्य रास्ता रोको केला. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे अडीच तासांपासून चाललेलं रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं गेलं आहे, त्यामुळे अडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे.