Shivaji Maharaj: 'महाराज आम्हाला माफ करा', भाजपचा जाहीर माफीनामा; पण मविआवर...

मुंबई तक

28 Aug 2024 (अपडेटेड: 28 Aug 2024, 10:18 PM)

BJP Apology On Twitter : मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. परंतु, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत.

BJP Tweet On Chhatrapati Shivaji Maharaj

BJP Tweet On Chhatrapati Shivaji Maharaj

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजपने मागितली माफी

point

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपने ट्वीटरवर काय म्हटलंय?

point

भाजपची ट्वीटर पोस्ट का होतेय व्हायरल?

BJP Apology On Twitter : मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. परंतु, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. या घटनेवरून महायुती सरकार, भारतीय नौदल एकमेकांविरोधात आरोप करून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भाजपने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर जाहीर माफीनामा शेअर केला आहे.

हे वाचलं का?

"महाराज आम्हाला माफ करा! तुम्ही हिंदवी स्वराज्य घडवलं …अठरापगड जाती स्वराज्यात गुण्यागोविंदानं नांदत होत्या. मात्र आज या महाराष्ट्रात जाती-पातीत फूट पाडली जात आहे आणि तुमच्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचा कृत्य महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यांनी तुमच्या नावानं फक्त राजकारण केलं", असं म्हणत भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे. (A statue of Chhatrapati Shivaji Maharaj was unveiled by Prime Minister Narendra Modi in Rajkot Fort area of ​​Malvan. However, after the fall of the statue of Shiv Raya, the leaders of Mahavikas Aghadi have become very aggressive and are attacking the rulers)

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "नारायण राणे कुणाला धमक्या..."; राजकोटच्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

भाजपने ट्वीटरवर काय म्हटलंय? 

महाराज आम्हाला माफ करा!

तुम्ही हिंदवी स्वराज्य घडवलं … अठरापगड जाती स्वराज्यात गुण्यागोविंदानं नांदत होत्या. मात्र आज या महाराष्ट्रात जाती-पातीत फूट पाडली जात आहे आणि तुमच्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचा कृत्य महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यांनी तुमच्या नावानं फक्त राजकारण केलं…
तुमच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, तुमच्या पराक्रमाची प्रत्येक पिढीला साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांवर जेव्हा अतिक्रमण झाले तेव्हा मतांच्या हव्यासापोटी मविआ नेत्यांची ते अतिक्रमण हटविण्याची हिंमत सुध्दा झाली नाही. कारण महाराज तुमच्यापेक्षा यांना सत्ता कायम महत्त्वाची वाटली. 
मात्र शिवरायांच्या विचारांनी प्रेरित एक सच्चा मावळा, आपल्या गड-किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण हटवत आहे. पण हे देखील महाविकास आघाडीच्या डोळ्यात खुपत आहे, म्हणूनच या सच्च्या मावळ्याविरोधात या असुरी शक्ती उभ्या आहेत. उभा महाराष्ट्र हे पाहतोय!


 

    follow whatsapp