Sanjay Raut: "देवेंद्र फडणवीसांना उपचारांची गरज..."; खासदार संजय राऊतांची घणाघाती टीका

मुंबई तक

16 Nov 2024 (अपडेटेड: 16 Nov 2024, 11:52 AM)

Sanjay Raut On Devendra Fadnavis: "या महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाकिस्तान, बांगलादेश, बटेंगे तो कटेंगे, हे काय चाललंय? या देशात महाराष्ट्रात निवडणुका लढत आहात, मग वोट जिहाद कसला? तुम्हाला एखाद्या जाती-धर्माची, समाजाची मतं मिळत नाहीत.

Sanjay Raut On Devendra Fadnavis

Sanjay Raut On Devendra Fadnavis

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊतांन वोट जिहादच्या मुद्द्यावरून फडणवीसांना सुनावलं

point

"महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाकिस्तान, बांगलादेश, बटेंगे तो कटेंगे..."

point

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Devendra Fadnavis: "या महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाकिस्तान, बांगलादेश, बटेंगे तो कटेंगे, हे काय चाललंय? या देशात महाराष्ट्रात निवडणुका लढत आहात, मग वोट जिहाद कसला? तुम्हाला एखाद्या जाती-धर्माची, समाजाची मतं मिळत नाहीत. कोणी कोणाला मत द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. 2014 च्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोदींना मत दिलं. मग तो वोट जिहाद समजायचा का? यांच्या मानसिक गोंधळाविषयी आम्हाला चिंता वाटते. 23 तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढेल. त्यांना कोणते आजार जडतील, याविषयी मला चिंता वाटते. देवेंद्र फडणवीसांना उपचारांची गरज आहे", असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

हे वाचलं का?

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, देवेंद्र फडणवीस बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयत. हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्या मतदारांना भारतीय संविधानाने दिलेला मताचा अधिकार आहे. ते आपलं मत त्यांना वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही. ह्यांना संविधान बदलायचं आहे. तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीने दबाव आणताय, गोंधळ निर्माण करतात. देवेंद्र फडणवीस म्हणतात धर्मयुद्ध..हे काय धर्मयुद्ध आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 

हे ही वाचा >>Sushma Andhare: "बाळासाहेबांना खुनी म्हणणाऱ्या निलेश राणेंना...", सुषमा अंधारेंनी CM एकनाथ शिंदेंना सुनावलं

महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे. फडणवीस असं म्हणतायत आपण एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंग फडकवू. डोकं ठिकाणावर आहे का? पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचं वगैरे सोडून द्या. गेल्या दहा वर्षापासून तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर घेतायत ना...तिथे जरा तिरंगा फडकवून दाखवा. मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. फडणवीस आपण लालकिल्ल्यावर तिरंगा फडकवायला गेला होता. मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवा. लडाखमध्ये पेग्वॉन लेकच्या इथे चीन घुसलेला आहे, तिथे चीनव्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा फडकवा, असं थेट आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.

हे ही वाचा >> Gold Rate Today : लग्नसराईच्या धामधुमीत सोन्याचे दर प्रचंड घसरले! आजचा 24 कॅरेटचा भाव किती?

    follow whatsapp