Vijay Wadettiwar Tweet : "शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...", विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Manikrao Kokate Latest News:  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे चुलत भाऊ सुनील कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Vijay Wadettiwar On Manikrao Kokate

Vijay Wadettiwar On Manikrao Kokate

मुंबई तक

20 Feb 2025 (अपडेटेड: 20 Feb 2025, 07:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास

point

विजय वडेट्टीवार यांनी केलं खळबळजनक ट्वीट

point

वडेट्टीवार ट्वीटरवर नेमकं काय म्हणाले?

Manikrao Kokate Latest News:  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे चुलत भाऊ सुनील कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वर्ष 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना दणका दिला आहे.अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलीय. 

हे वाचलं का?

विजय वडेट्टीवार यांचं ट्वीट जसंच्या तसं

आरोपीचे नाव : माणिकराव कोकाटे
पद: महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री
झालेली शिक्षा: २ वर्ष कारावास, ५०,००० रुपयांचा दंड.
गुन्हा: कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक .

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा! 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे.

हे ही वाचा >> "दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदीजींचा भगवा, लाडक्या बहिणीला...", DCM एकनाथ शिंदे दिल्लीत नेमकं काय म्हणाले?

इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे. दररोज आरोप होत आहे, कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे.

हे ही वाचा >> Pratap Sarnaik : "तुळजापूर, धाराशिवमधून ड्रग्ज तस्करांचा नायनाट करा, नाहीतर...", सरनाईकांनी पोलिसांनाही दिला इशारा

दरम्यान, माणिकराव कोकोटे यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधींना दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्यांना सभागृहाचं सदस्यत्व गमवावं लागू शकतं. त्यामुळे कोकाेटे यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली असून त्यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. 


 

    follow whatsapp