'आंदोलनाला डाग आणि तडा जाऊ देऊ नये', बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला

मुंबई तक

• 06:36 PM • 25 Feb 2024

'गेल्या कित्यक दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला शेवटच्या टप्प्यात कोणतंही गालबोट लागू नये. त्यामुळे त्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला.

bacchu Kadu

bacchu Kadu

follow google news

बातम्या हायलाइट

point

आंदोलनाला डाग आणि तडा जाऊ देऊ नये

point

आंदोलनातून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये

Bacchu Kadu: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून आंदोलन पेटलेले असतानाच आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (DCM Devendra Fadnavis) त्यांनी लक्ष्य केले. मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन संपवण्याचं कटकारस्थान फडणवीसांनी केलं असल्याचं सांगत त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांना पुढं करून मला बदनाम करण्याचं काम फडणवीसांनी केलं आहे. 

हे वाचलं का?


देवेंद्र फडणवीस यांनीच मला संपवण्याचंही करस्थान रचल्याचाही त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता मीच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येतो असं म्हणत जरागे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. त्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांना सल्ला देत त्यांनी आंदोलनाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

डाग लागू देऊ नये

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, 'मराठा आरक्षणासाठी ते एवढ्या दिवस आंदोलन करत आहेत, ते इतकी मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्याला आता कुठंही तडा आणि डाग लागू देऊ नये' असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

हे ही वाचा>> Manoj Jarange : फडणवीसांना जरांगेचं खुल्लं चॅलेंज


आमदार बच्चू कडू म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता त्या गोष्टीला त्यांनी कोणताही डाग लागू देऊ नये. त्याचबरोबर इतकीही टोकाची भूमिका घेऊ नये. कारण या हे आंदोलन कोणाच्याही जीवाशी संबंधित नाही मग ते देवेंद्र फडणवीस असो की, जरांगे पाटील असो. 

चुकीचा अर्थ

मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन चालले असले तरी त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये तर त्यातून चांगला मार्ग कसा काढता येईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आंदोलनात टोकाची भूमिका घेणं थांबवावं असंही बच्चू कडू यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या आंदोलनामुळे जरांगे पाटील हे नाव आणि व्यक्ती आता मर्यादित राहिली नाही. त्यामळे त्यांनी उभारलेले आंदोलन वेगळ्या गोष्टीमुळे लक्ष्यवेधी ठरलं आहे. त्यामुळे आता वेगळे निर्णय घेऊन आंदोलनात चुकीचा संदेश जाऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp